१२ जुलै २००७ रोजी नर्सिंग प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली आहे. कडा या गावाची लोकसंख्या ३५,००० पर्यंत असून बीड जिल्हा हा उसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील आर्थिक मागास मुले मुली स्थलांतरामुळे वैद्यकीय पासून वंचित राहिले आहेत.

 

मी या जिल्ह्यातील रहवाशी असुन माझी वैद्यकीय व्यवसाय कडा या गावात होता. सार्वजनिक आरोग्य या दृष्टीकोनातुन  हा जिल्हा मागास आहे. माझे असे लक्षात अले की या स्थलांतरीत कामगारांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण घ्यायला पाहिजे म्हणून मी कडा या ग्रामीण भागात नर्सिंग स्कूल चालु केले. जेणे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थांना बाहेर न जाता शिक्षण याच जिल्ह्यात घाता येईल त्यासाठी या स्कूलची स्थापना केली.

 

दुसरा उद्देश ग्रामीण भागात महिलांचे, बालकांचे आरोग्य हे सर्वगुण संपन्न नाही तसेच गर्भवती महिला आणि बालकांचा म्रुत्युदर कमी  करण्यासाठी या  नर्सिंग स्कूलची स्थापना केली गेली आहे.

 

मी स्वत:  वैद्यकीय पदवीधर असुन मी पूर्ण वेळ या नर्सिंग स्कूलसाठी देत आहे. मी स्वत: काही विषय शिकवत आहे. या नर्सिंग स्कूलमध्ये महाराष्ट्र नर्सिंग कौंसिल  नामांकानुसार प्रशिक्षण दीले जाते तसेच अनुभवी शिक्षक व वेळोवेळी तज्ञ डॉक्टर मार्गदर्शनासाठी येतात.

 

तसेच आमचे नर्सिंग स्कूलसाठी सामान्य रुग्नालय, जि. अहमदनगर,  ग्रामीण रुग्नालय, ता. आष्टी, जि. बीड व प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. कडा, जि. बीड असे नामांकीत रुग्नालय विद्यार्थांना प्रात्यक्षिक करण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे.

 

नर्सिंग स्कूलची निसर्गरम्य भव्य अशी इमारत असून या इमारतीमध्ये सर्व प्रयोगशाळांनी युक्त साहीत्य, सुसज्ज ग्रंथालय, सर्व सोयींनीयुक्त वर्ग, ऑफीस व अनुभवी कर्मचारी आहेत. तसेच पहीला व दुसरा मज्ञला येथे मुलींची सर्व सोयींनीयुक्त वस्तिग्रुह व मेसची सोय केलेली आहे. सर्व प्रशिक्षणार्थिंना ग्रामीण भागात गावो गावी सर्वे करण्यासाठी ३० सिटर बसची व्यवस्था आहे. तसेच  स्कूलमध्ये Outdoor, Indoor Games सुविधा आहे.

 

त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास करउन वेळोवेळी पूर्व परीक्षा घेतली जाते. सन २००७ पासून स्कूलचा निकाल १०० टक्के आहे.

आमच्या स्कूलमध्ये  प्रशिक्षणार्थि प्रत्येक वर्षी विभागीय मनोविकार रुग्नालय, पूणे येथे प्रात्यक्षिक अनुभवासाठी पाठवले जातात. त्याचप्रमाणे या प्रशिक्षण केंद्रात सहाय्यक परिचीका प्रसाविका( R.A.N.M) हा १८ महीन्यांचा कोर्स चालविला जातो.

 

w ठिकाण-

 कडा हे गाव. ता. आष्टी, जि. बीड येथे असून बीड शहरा पासुन ११५ कि.मी. तर अहमदनगर शहरा पासुन ४५ कि.मी. अंतरावर आहे.

 

Click here for Shikshan Shulka Samiti Proposal